ढेकूसीमच्या शेतकर्‍याची गळफास घेत आत्महत्या


A farmer of Dhekusim committed suicide by hanging himself अमळनेर : अमळनेर तालुक्यातील ढेकूसीम गावातील 50 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होवू शकले नाही.

अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
राजेंद्र नगराज पाटील (50) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. शेतकरी राजेंद्र पाटील यांनी गुरुवारी पहाटे आपल्या शेतातील खळ्यात बांधलेल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. या घटनेबाबत अमळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !