यावल शहरात चोरटे सैराट : दोन बंद घरे फोडली
Thieves raid in Yaval city : Two closed houses were broken into यावल : शहरातील मेन रोडवर तसेच महाजन गल्लीत अशा दोन ठिकाणी बंद घरांमध्ये घरफोडी झाल्याचे शनिवारी उघडकीस आले. सुदैवाने दोन्ही घरात मौल्यवान वस्तू नसल्याने दोघा कुटुंबाचे नुकसान टळले. बंद घर पुन्हा चोरटे लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
सुदैवाने घरात ऐवज नसल्याने दिलासा
घटनास्थळावर पोलिसांच्या पथकाने जाऊन संपूर्ण तपासणी केली. दोघा कुटुंबाची विचारणा केल्यानंतर घरात मौल्यवान वस्तू नसल्याने कुठलेच नुकसान झाले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यावल शहरातील मेन रोडावर एस.जी.कवडीवाले यांच्या बंद घराची कडी अज्ञात चोरट्याने तोडल्याचे शनिवारी सकाळी निर्दशनास आले. महाजन गल्लीतील रहिवासी नितीन उर्फ सतीश मधुकर धानोरे यांचे बंद घरदेखील अज्ञात चोरट्यांनी फोडलेले दिसले. या दोन्ही घटनेबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे पथकासह दाखल झाले. दोन्ही घरात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून प्रवेश केलेला दिसून आला तसेच घरातील कपाटासह साहित्यांची फेकाफेक केलेली दिसून आली मात्र दोन्ही घरातून कुठल्याच प्रकारचे मौल्यवान साहित्य नसल्याने नुकसान टळले.



