जळगावात 33 वर्षीय महिलेचा पिता-पूत्रांनी केला विनयभंग


A 33-year-old woman was molested by her father and son in Jalgaon जळगाव : जळगाव शहरातील एम.जे.कॉलेज परीसरातील प्रभात कॉलनीत नातेवाईकांकडे आलेल्या 33 वर्षीय महिलेचा पिता-पूत्रांनी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. ही घटना रविवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लघूशंका करीत केले अश्लील वर्तन
जळगाव शहरातील एका भागातील 33 वर्षीय महिला नात्यातील चुलत बहिणीकडे प्रभात कॉलनीत आल्यानंतर रविवारी रात्री 12.30 वाजता त्यांचे पोट दुखू लागल्याने त्या मध्यरात्री रस्त्यावर एकट्या पायी फिरत असताना याच भागातील आरोपीने महिलेसमोरच लूघशंका केली तसेच आरोपीच्या मुलाचे महिलेकडे बघून तु काय अप्सरा आहेस का? म्हणत म्हणत तिचा उजवा हात धरुन तिला आपल्याकडे ओढून घेतले. या घटनेमुळे भयभीत महिलेने रामानंद नगर पोलिसात धाव तक्रार दिल्यानंतर सुनील चुनीलाल पाटील व परीक्षीत सुनील पाटील (जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उषा सोनवणे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !