धरणगाव तालुक्यात 10 वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग
A 10-year-old girl was attacked in Dharangaon taluka धरणगाव : पाणी भरण्याच्या बहाण्याने दहा वर्षीय चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात 38 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली.
तरुणाविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील एका गावात 10 वर्षीय अल्पवयीन चिमुकली परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 20 मे रोजी दुपारी साडेतीन वर्षाच्या सुमारास गावातीलच संशयित कडू उर्फ देविदास मधुकर नन्नवरे (38) याने पीडित मुलीला पाणी भरण्याचा बहाणा करून घरात बोलावले तसेच तिचे तोंड दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडीतेने कुटूंबियांना सांगितल्याने पीडित मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी कडू उर्फ देविदास मधुकर नन्नवरे याच्या विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.


