रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखीचा मृत्यू
A stranger died after being hit by a running train on the railway line जळगाव : कुठल्यातरी धावत्या गाडीचा धक्का लागल्याने अनोळखी प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव-आसोदा रेल्वे अपलाईन रेल्वेलाईनजवळ सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव ते आसोदा रेल्वे च्या डाऊन लाईनवर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका 55 वर्षीय अनोळखी पुरूषाचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी तथा ट्रॅकमॅन उमेश भारंबे यांनी यासंदर्भात जळगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक यांना घटनेची माहिती दिल्यानंतर सोमवारी सकाळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सहाय्यक फौजदार अनिस सपकाळे आणि हवालदार मराठे यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करीत तो शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखीचे ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


