भरधाव ट्रकने चिरडल्याने पाळधीतील हॉटेल वेटरचा मृत्यू


A hotel waiter in Paladhi died after being crushed by a speeding truck जळगाव : रस्त्याने पायी चालणार्‍या 37 वर्षीय हॉटेलमधील वेटरला ट्रकने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात पाळधीनजीकच्या हॉटेल गोंविंदा समोर सोमवारी मध्यरात्री अडीच वाजता घडला. या प्रकरणी सोमवार, 22 मे रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संदीप लहू कवडकर (37, रामजीपुरा, रावेर, ह.मु. पाळधी, ता.धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अज्ञात ट्रकचा पोलिसांकडून शोध
संदीप कवडकर हा तरुण पाळधी गावातील हॉटेल गोविंदा येथे वेटर म्हणून कामाला होता. सोमवारी मध्यरात्री संदीप हा पायी जात असतांना मागून येणार्‍या भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने ंदीप हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !