नशिराबादला जाब विचारल्याच्या वादातून चौघांना मारहाण


Four people were beaten up due to a dispute over asking Nashirabad for Jab नशिराबाद : जाब विचारल्याच्या वादातून शहरातील चौघांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवार, 21 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरात घडली. या घटनेत चारही जण जखमी झाले असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जाब विचारल्यानंतर वाढला वाद
नशिराबाद गावातील मोमीन मोहल्ला येथे वसीम शहा रहेमान शहा (23) हा वास्तव्यास असून रविवार, 21 रोजी सकाळी वसीम शहा हा घराजवळ असताना याच परीसरातील शरीफ पिंजारी यांच्यासह पाच ते सहा जण याठिकाणी आले. त्यांनी वसीम शहा यास आवाज देवून थांबविल्याने मला का थांबविले ? असे विचारले असता, शरीफ पिंजारी यांच्यासह त्याच्यासोबतच्या सहा जणांनी वसीम शहा यास मारहाण केली. वसीम शहा याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून सहा टाके पडले आहेत तर यावेळी तीन जण हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, सहा जणांनी तिघांनाही मारहाण केली. तिघांपैकी एजाज पिंजारी व अख्तर शहा सादीक शाहा यांना सुध्दा डोक्यात टाके पडले असून अक्रम शहा याच्या हाताचे हाड मोडले आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी वसीम शहा याने रात्री दिलेल्या तक्रारीवरुन शरीफ पिंजारी, कलीम शरीफ पिंजारी, शोएब शरीफ पिंजारी, शकीना पिंजारी, हसीना पिंजारी, व रशीदा पिंजारी (सर्व रा.मोमीन मोहल्ला, नशिराबाद) या सहा जणांविरोधात नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल युनूस शेख हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !