साकेगाव फार्मसीजवळ अनोळखी इसमाचा सांगाडा आढळला


भुसावळ :  तालुक्यातील साकेगावजवळील साकेगाव फार्मसी महाविद्यालयाजवळील बाळू काचवाल्याच्या दुकानामागील शेतात 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुण इसमाचा सांगाडा झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुका पोलिसांना माहिती कळाल्यानंत यंत्रणेने धाव घेत सांगाडा ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात फॉरेन्सिक तपासणीसाठी हा सांगाडा पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.

मयत भिकारी असल्याचा संशय
शनिवारी दुपारी साकेगाव फार्मसीजवळील एका शेतात 30 ते 35 वयोगटातील मृतदेहाचा केवळा सांगाडा शिल्लक अवस्थेत मृतदेह पडून असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. अनोळखी मृत्यूला अनेक दिवस झाल्यानंतर मानेखालील भाग श्वापदांनी खाल्ल्याने केवळ सांगाडाच व चेहर्‍याचा काही भाग शिल्लक असल्याने पोलिसांनी नागरीकांच्या माध्यमातून मयत हा भिकारी असल्याची ओळख पटवली आहे. मयत हा भिकार्‍याचा कुठलाही घातपात नसून उष्माघातामुळे वा अन्य कारणामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस यंत्रणेने वर्तवला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !