येवल्यातून अल्पवयीन मुलीला पळवले : संशयिताला अटक


चाळीसगाव : येवला शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयिताला चाळीसगाव शहर पोलिसांनी सापळा रचून येथील दर्गा परीसरातून अटक केली. अधिक कारवाईसाठी संशयितासह तरुणीला येवला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

येवला पोलिसांनी घेतला संशयिताचा ताबा
शहरातील दर्गा परीसरात सोमवारी रात्री शहर पोलीस गस्त घालत असताना संशयित एका अल्पवयीन मुलीसोबत मिळून आला. त्याला त्याचे नाव विचारले असता अमोल उर्फ भावड्या दिलीप वाघ (24, राजापूर, ता.येवला, जि.नाशिक) असे सांगितले मात्र अल्पवयीन मुलीविषयी माहिती देण्यात न आल्याने संशय बळावल्याने अधिक विचारपूस केल्यानंतर संशयिताने मुलीला पळवून आणल्याची कबुली देताच येवला पोलिसांना माहिती कळवण्यात आली. संशयित अन्य तीन गुन्ह्यात वॉण्टेड असून त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याने त्याबाबत गुन्हा असल्याची माहिती आहे. संशयितासह तरुणीला येवला तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !