जळगावात पुन्हा धूम स्टाईल मोबाईल लंपास
Dhoom style mobile lampas again in Jalgaon जळगाव : धूम स्टाईल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाईल लांबवला. ही जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज समोरील रोडवर जानेवारी महिन्यात घडली होती मात्र तब्बल चार महिन्यानंतर तरुणाने तक्रार दिल्यावरून मंगळवार, 23 मे रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चार महिन्यानंतर तक्रार दाखल
जयेश प्रकाश राणे (18, म्हैसवाडी, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) हा तरूण जळगाव शहरात शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहे. 11 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जयेश हा जळगाव भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराडाईज समोरील रोडवरून मोबाईलवर बोलत पायी जात असताना त्याच्या मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले व काही कळण्याआत त्यांनी जयेशच्या हातातील 13 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. जयेशने ही घटना घरी कुणालाही सांगितली नाही मात्र मंगळवारी त्याने हा प्रकार सांगितल्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहे.


