समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबेना ! : एकाच कुटूंबातील सुरतमधील चौघे भावंड ठार


The series of accidents on Samriddhi Highway does not stop : Four siblings of the same family were killed

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका कायम आहे. पहाटेच्या वेळी डुलकी आल्यानंतर नियंत्रण सुटलेले वाहन दुभाजकावर आदळल्याने एकाच कुटूंबातील चौघे चुलत भाऊ ठार झाले. विशेष म्हणजे चारही मयत भावंडे असून ते काकांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून सुरतकडे निघाल्यानंतर हा अपघात बुधवारी पहाटे घडला. समृद्धी महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर येथे करमाड-शेकटा गावाजवळ घडलेल्या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

चौघे चुलत भाऊ ठार
संजय राजणभाई गौड (43), कृष्णा राजणभाई गौड (44), श्रीनिवास रामू गौड (38), सुरेशभाई गौड (41, सर्व रा.लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) असे अशी मयत चुलत भावांची नावे आहेत.

पहाटेच्या वेळी डुलकीने केला घात
तेलंगणा येथील काकांचे निधन झाल्याने चौघे सुरतस्थित भावंडे चारचाकी वाहनातून अंत्यविधीसाठी गेले होते व परतीच्या प्रवासात बुधवारी पहाटे चालकाला झोप आल्याने वाहनावर नियंत्रण सुटताच ते दुभाजकावर आदळले. करमाड – शेकटा येथील समृद्धी महामार्गावर हा अपघात घडताच तिचे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कॉपी करू नका.