किरकोळ वादातून तरुणाला चौघांनी केली मारहाण


पहूर : वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला चौघांनी शिविगाळ करीत मारहाण केली. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रोहिणीच्या मागे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना माशांचे उष्टे पीस अंगावर पडल्याच्या कारणावरून रविकिरण रामलाल चौधरी (खादगाव, ता.जामनेर) या तरुणाला योगेश भरत चौधरी, रमेश तापीराम चौधरी, राजीव तापीराम चौधरी, पंकज भरत चौधरी (सर्व रा.खादगाव) यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर लोखंडी रॉड मारून हाताचे बोटांवर दुखापत केली. शिवाय इतरांनी लाथाडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर रविकिरण चौधरी आणि पहूर पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !