जामनेर तालुक्यातील महिलेचा विनयभंग करून पतीला मारहाण


Woman molested and beaten by her husband in Jamner taluka जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय महिलेचा जुन्या भांडणाच्या कारणावरून वादातून विनयभंग करण्यात आला तसेच महिलेच्या पतीलादेखील मारहाण करण्यात आली. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या वादातून केला विनयभंग
30 वषीय महिला ही जामनेर तालुक्यातील एका गावात आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील सुनील आत्माराम ठाकरे, अशोक धोंडू धनगर, दीपक भानुदास धनगर यांनी 23 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास महिलेचा हात पकडून अंगावरील कपडे फाडले. तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत विनयभंग केला. शिवाय तिचे पती यांना लाथाबक्क्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित सुनील आत्माराम ठाकरे, अशोक धोंडू धनगर, दीपक भानुदास धनगर या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !