कानळद्यात हद्दपार आरोपीची तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी अखेर जाळ्यात
Deportation accused in Kanalda terrorized at sword point : Accused finally in the net जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमीवर दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करीत कानळदा येथे तलवार बाळगून दहशत निर्माण करणार्या संशयिताच्या यंत्रणेने मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी संशयिताविरोधात जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश इच्छाराम सपकाळे (काळनदा) यास अटक करण्यात आली.
जळगाव तालुका पोलिसांची कारवाई
संशयित आकाश हा जिल्ह्यातून दोन वर्षानंतरही हद्दपार असताना कानळदा येथे आला असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात तलवार बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास तलवारीसह पकडण्यात आले. ही कारवाई बुधवार, 24 रोजी रात्री पावणेआठ वाजता करण्यात आली. पोलीस कर्मचारी प्रशांत ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे करीत आहेत.


