जळगावातील रीक्षा चालकाची आत्महत्या : दोघा भावंडांविरोधात गुन्हा


Suicide of auto rickshaw driver in Jalgaon : Crime against two siblings जळगाव : वडिलोपार्जित शेतीत भावंडांनी हिस्सा न दिल्याने आलेल्या नैराश्यातून जळगावातील रीक्षा चालक व्यावसायीकाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी भावंडांनी शेतीचा हिस्सा दिला असता तर जमीन विकून कर्ज फेडता आले असते मात्र हिश्याअभावी कर्ज न भरल्याची खंत त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती. मयत संजय चावदस सपकाळे (58, रा.कासमवाडी) यांना आत्महत्येचे प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या दोघा भावंडांविरोधात बुधवारी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा
जळगाव शहरातील कासमवाडी रीसरात संजय सपकाळे हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. मंगळवारी त्यांची पत्नी घरी असतांना त्यांचा भाऊ गजानन सोनवणे याने आपल्या बहिणीला फोन करुन मेहुणे हे रेल्वेखाली येवून मयत झाल्याचे सांगितले. तत्पूर्वी त्याींन मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केली होती. ती रेकॉर्डींग गजानन सोनवणे यांनी आपल्या बहिणीला ऐकवली होती. त्या रेकॉर्डींगमध्ये संजय सपकाळे यांनी भावाने मला हिस्सा न दिल्याने मी कर्ज भरू शकलो नाही. आधार सपकाळे, शांताराम सपकाळे आदींमुळे मी आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे शिवाय काही व्याजाने पैसे देणार्‍यांनी मारहाण केल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणी मयताची पत्नी कल्पना सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आधार चावदस सपकाळे (60, कुंवरखेडा, पोस्ट नांद्रा, जि.जळगाव) व शांताराम चावदस सपकाळे (57, जुना आसोदा रोड, जळगाव, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) यांच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !