चाळीसगाव तालुक्यातील मृत बिबट्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार
Funeral of dead leopard in Chalisgaon taluka चाळीसगाव : तालुक्यातील ओढरे विष्णुनगर शिवारातील शेतातील विहिरीत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत बुधवारी सकाळी आढळल्यानंतर जागेवरच त्याच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे दहा दिवसांपूर्वी पाण्याच्या वा भक्ष्याच्या शोधार्थ आल्यानंतर बिबट्या विहिरीत कोसळल्याचा अंदाज आहे
50 फूट खापेल विहिरीत पडल्याने मृत्यू
ओढरे विष्णूनगर येथील आत्माराम तुळशीराम चव्हाण यांच्या विष्णुनगर ओढरे शिवारातील शेतातील विहिरीत बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवळपास 50 फूट खोल असलेल्या व 17 फूट पाणी असलेल्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत बिबट्या आढळल्यानंतर पशूवैद्यकीय अधिकारी सस्ते यांनी तपासणीअंती दहा ते पंधरा दिवसांपूर्वी बिबट्या मृत झाल्याचा अंदाज वर्तवला. बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्याच्याही स्थितीत नसल्याने घटनास्थळी जागेवरच शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. ओढरे परीसर जंगलाला लागून आहे. त्यामुळे मृत बिबट्या अन्न-पाण्याच्या शोधार्थ ओढरे शिवारात आल्यानंतर विहिरीत पडल्याचा अंदाज आहे.


