मुक्ताईनगरातील खडसे महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्यांचा मोबाईल चोरीला


The mobile phone of the retired principal of Khadse College in Muktainagar was stolen मुक्ताईनगर : भाजीपाला बाजारात कार लावल्यानंतर चोरट्यांनी कारमधील सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. ही घटना मंगळवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
खडसे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य वासुदेव रघुनाथ पाटील (64, मुक्ताईनगर) हे मंगळवात्री रात्री कारद्वारे शहरातील भाजीपाला मार्केटनजीक आल्यानंतर त्यांनी कार पार्क केल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून कारच्या डॅशबोर्डवर ठेवलेला सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !