हरीद्वार निघालेल्या आई-वडिलांना सोडण्यास आलेल्या चाळीसगावातील शिक्षकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू


A teacher from Chalisgaon, who had come to drop off his parents who had left for Haridwar, died after being hit by a train चाळीसगाव : आई-वडिल हरीद्वार येथे तीर्थयात्रेस जात असल्याने त्यांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरूवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. योगेश गंभीरराव सुर्यवंशी (41) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. सूर्यवंशी हे चिंचगव्हाण माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.

रेल्वेतून उतरताना पाय घसरला
शिक्षक सूर्यवंशी हे आई-वडिल व कुटूंबासह भडगाव रोडवरील विवेकानंद कॉलनी, बाप्पा पाँईटला वास्तव्यास होते. आई-वडील हे हरीद्वार येथे तीर्थयात्रेस जात असल्याने त्यांना सोडण्यासाठी गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावर आले असता त्यांनी आई-वडिलांना दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये बसवले. त्याचवेळी गाडी सुरू झाल्याने गर्दीतून उतरतांना योगेश पाटील यांना उशीर झाल्याने गाडीने वेग घेतला. घाई-घाईत रेल्वे गाडीतून उतरतांना ते रेल्वे गाडीखाली ओढले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार प्लॅटफार्मवरील इतर प्रवाशांचा लक्षात येताच त्यांनी धाव घेतली परंतु तो पर्यंत उशीर झाला होता.

दुर्देवी घटनेने हळहळ
या घटनेची माहीती मिळताच योगेश सुर्यवंशी यांच्या मित्रांसह त्यांच्या नातेवाईकांनी रेल्वे स्थानकावर धाव घेतली. तीर्थयात्रेस जात असलेल्या त्यांच्या आई-वडिलांना पाचोरा रेल्वे स्थानकावर उतरवून चाळीसगाव येथे आणण्यात आले. मृत शिक्षक योगेश सूर्यवंशी यांच्यावर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !