वांजोळ्यात संशयित आरोपीचे घर पेटवले : दोन अटकेत, चौघांविरोधात गुन्हा


Suspected accused’s house set on fire in Wanjola : Two arrested, case against four भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे एका गुन्ह्यातील संशयित तरुणाचे घर पेटवून तरुणाच्या नातेवाईकांना मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी एक वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने वांजोळा गावात खळबळ उडाली असून या प्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

गुन्ह्यात मदत केल्याच्या संशयातून मारहाण
भीमराव गंभीर तायडे (55, वांजोळा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या साडूचा मुलगा कैलास अशोक तायडे हा एका गुन्ह्यात संशयित आरोपी असून तो बुधवारी भीमराव तायडे यांच्याकडे पाणी पिण्यासाठी आल्यानंतर संशयितांना फिर्यादीसह त्याचा परीवार गुन्ह्यात मदत करीत असल्याचा संशय आल्याने त्यांनी तायडे कपाळावर बुक्का मारत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच फिर्यादीचा पुतण्या रोशन तायडे व कृष्णा तायडे हे वाद सोडवण्यासाठी गेल्यानंतर संशयितांनी त्यांना शिविगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी एका गुन्ह्यातील संशयित कैलास अशोक तायडे याच्या घरात अनधिकृत प्रवेश करीत पेट्रोल टाकून घर पेटवून दिल्याने घरासह साहित्याचे मोठे नुकसान झाले.

यांच्याविरोधात गुन्हा
या प्रकरणी भीमराव तायडे यांच्या फिर्यादीवरून पंकज निवृत्ती तायडे, रवींद्र आनंदा मोरे, साधना रवींद्र मोरे, सुभाष वना मोरे (वांजोळा, ता.भुसावळ) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार आदींनी भेट दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !