कन्नड घाटात अपघात : छत्रपती संभाजीनगरच्या प्रौढाचा मृत्यू
Accident at Kannada Ghat : Adult of Chhatrapati Sambhajinagar dies चाळीसगाव : भरधाव आयशरने दुचाकीला धडक दिल्याने छत्रपत्रती संभाजी नगर जिल्ह्यातील मजुराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली. आनंदराव अभिमन पाटील (42, वडगाव कोलाठी, गट क्रमांक आठ, वाळूज, एमआयडीसी) असे मयताचे नाव आहे.
आयशरच्या धडकेने मृत्यू
शनिवार, 20 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाटील हे आपल्या दुचाकीवरून (क्र.एम.एच. 20 जी.एल 1171) ने छत्रपती संभाजीनगराकडे जात असता कन्नड घाटातील सरदार पॉईंटच्या मोठ्या वळणावर भरधाव वेगाने ओव्हरटेक करणार्या आयशरने (क्र. टी.एस.15 यु.डी.0118) दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात आनंदराव पाटील यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना लागलीच औषधोपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आयशर चालक सल्लाउद्दीन समद कारभारी (28, लामजावा, जि.लातूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नंदलाल परदेशी करीत आहेत.


