धुळ्यासह जळगावातील अट्टल चैन चोरटे रामानंद पोलिसांच्या जाळ्यात : तब्बल 19 गुन्ह्यांची कबुली


Attal chain thieves in Jalgaon with Dhule in the net of Ramanand police जळगाव : रामानंद पोलिसांनी धूम स्टाईल चैन लांबवणार्‍या जळगावसह धुळ्यातील आरोपीच्या मुसक्या बांधल्या असून त्यांच्याकडून तब्बल 19 गुन्ह्यांची कबुली मिळवली आहे. दत्तात्रय अमृत बागुल (39, रा.मोहननगर, मुळ रा.मोहाडी, जि.धुळे) व सुधारक उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (25, रा. रामेश्वर कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

आणखी गुन्हे उघडकीस येणार
रामानंदनगर, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी धूमस्टाईलने खेचून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. काही दिवसांपूर्वी नूतन वर्षा कॉलनीमध्ये 70 वर्षीय वृध्द महिलेची सोनसाखळी लांबवून पळणार्‍या दत्तात्रय बागूल याला रामानंदनगर पोलिसांनी पकडले होते. नंतर त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने 19 सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली देत साथीदार सुधाकर महाजन हादेखील सहभागी असल्याचे सांगताच त्यालाही अटक करण्यात आली. आरोपंनी 2018 ते 2023 मे पर्यंत त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 14 तर जिल्हापेठच्या हद्दीत दोन आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन असे एकूण 19 सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत. त्यापैकी 14 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे.

गुन्ह्यातील 26 तोळे सोने केले जप्त
रामानंदनगर पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच 26 तोळे सोने जप्त केले आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई रामानंद निरीक्षक शिल्पा पाटील, सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले, संजय सपकाळे, सुशील चौधरी, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, विजय खैरे, प्रवीण वाघ, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, उमेश पवार, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !