फैजपुर शहरात दक्षिण बाहेर पेठ भागात दंगल : दोन्ही गटातील 15 जणांविरूध्द गुन्हा


Riots in South Peth area of Faizpur city : Crime against 15 people from both groups यावल : फैजपूर शहरातील बाहेर पेठ भागात मागील भांडणाच्या कारणावरून एका कुटुंबातील चौघांना आठ जणांनी मारहाण केली व फायटरने जबर दुखापत केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या गटातील दोन जणांना मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला.

जुन्या भांडणाचा वाद उफाळला
फैजपूर शहरात बाहेर पेठ हा भाग असून या भागातील रहिवाशी रुपेश प्रभाकर कोळी यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाच्या कारणावरून त्यांच्या घरी सागर भालेराव, यश मेढे, रोहित प्रकाश मेढे, स्वप्निल बोदडे, अमोल तायडे, चेतन अनिल तायडे, अजय गणेश खंडाळे व सचिन गणेश खंडाळे (सर्व रा.फैजपूर) हे आठ जण आले व त्यांनी रुपेश कोळी, मोहन कोळी, कांचन कोळी व राणी कोळी या चौघांना लाठ्या-काठ्यांनी आणि फायटरने जबर मारहाण केली व त्यांना दुखापत केली तसेच लोखंडी रोडने एका तरुणीच्या हातावर दुखापत केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.

दुसर्‍या गटाकडून सात जणांवर गुन्हा
दक्षिण बाहेर पेठमधील रहिवासी गणेश माधव खंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मागील भांडणाच्या कारणावरून मयूर विठ्ठल कोळी, विशाल शशी कोळी, ठकसेन गोपाळ कोळी, रुपेश प्रभाकर कोळी, अक्षय समाधान कोळी, उषाबाई समाधान कोळी व कांचनबाई प्रभाकर कोळी (सर्व राहणार दक्षिण बाहेर पेठ, फैजपूर) या सात जणांनी येऊन त्यांना व त्यांच्या सुनेला मारहाण केली. त्यांना लाकडी काठीने जबर दुखापत करण्यात आली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रशीद तडवी करीत आहे. –





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !