भरधाव ट्रालाने उडवल्याने धरणगाव तालुक्यातील प्रौढाचा मृत्यू
An adult in Dharangaon taluka died after being blown over by a speeding trawler धरणगाव : वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रालाने दुचाकीला धडक दिल्याने वाघळूद, ता.धरणगाव येथील 43 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, 26 रोजी सकाळी 11 वाजता घडली. या अपघातात दुचाकीस्वार गजानन ईश्वर पाटील (43, वाघळूद, ता.धरणगाव) यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी ट्राला चालकाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ओव्हरटेकच्या प्रयत्नात अपघात
धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील गजानन पाटील हे दुचाकी (एम.एच.05 ए.के.4071) ने जात असताना पिंप्री गावाजवळ भरधाव ट्राला (एम.एच.18.बी.झेड.0622) वरील चालक सिद्धार्थ भूरसिंग वाघ (वैभव नगर, धुळे) ने दुचाकीला धडक दिल्याने पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्यासह खुशाल पाटील, दीपक पाटील, समाधान भागवत यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घेतली. अपघाताला कारणीभूत असलेला ट्राला जप्त करण्यात आला. सुनील नामदेव चौधरी (48, झुरखेडा, ता.धरणगाव) यांच्या फिर्यादीवरून ट्राला चालक सिद्धार्थ वाघ विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक दीपक पाटील करीत आहेत.


