जामनेरात झोक्यातील रूमालाचा फास बसल्याने एक वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू


A one-year-old boy died in Jamner due to a hanging handkerchief जामनेर : झोक्यातून बाळ न पडण्यासाठी आईने रूमाल बांधला मात्र बाळाला जाग आल्यानंतर त्याने हालचाल करीत झोक्याखाली उतरण्याचा प्रयत्न केला मात्र रूमालाचा फास बसल्याने एक वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. निर्भय इंगळे (वय एक) असे मृत बालकाचे नाव आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच आई-वडिलानी मोठ्या आनंदात निर्भयचा वाढदिवस साजरा केला होता. या घटनेने शहरता हळहळ व्यक्त होत आहे.

झोक्याचा रुमाल ठरला मृत्यूचे कारण
जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वसंत इंगळे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात तर त्यांच्या पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवारी दुपारी निर्भयचे वडील वसंत इंगळे कामानिमित्त बाहेर होते. शुक्रवारी दुपारी निर्भयच्या आईने कामावर जाण्यापूर्वी त्याला दूध पाजले आणि घरातील झोपाळ्याच्या झोळीत त्याला झोपविले. तसेच झोपाळ्यातून बाळ पडू नये म्हणून मध्यभागी रुमाल बांधला. एवढेच नव्हे तर घरात असलेल्या लहान बहिणीस बाळाकडे लक्ष देण्याचे सांगितले आणि मग घरातून बाहेर पडल्या मात्र अचानक जागे झालेल्या निर्भयने खाली उतरण्याचा प्रयत्न करताच संरक्षणासाठी बांधलेला रुमालच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.

कुटूबियांचा मन हेलावणारा आक्रोश
निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील बाळाकडे डोकावून पहिले निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील बाळाकडे डोकावून पहिले असता तो झोपेत होता. जेवण करून परतल्यानंतर पुन्हा बाळाकडे मावशी गेली असता तो झोळीबाहेर लटकलेला दिसल्याने त्यांनी त्याला बाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नसल्याने त्यांनी कुटुंबीयांना तत्काळ बोलावून घेतले. आई, वडिलांनी निर्भय यास जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !