शेती कामास गेलेल्या वहिनीवर अतिप्रसंग करणार्या दिराविरोधात गुन्हा : पारोळा तालुक्यातील घटना
Crime against daughter-in-law who abused sister-in-law who went to work in agriculture : incident in Parola Taluka पारोळा : शेतशिवारात कामासाठी गेलेल्या 28 वर्षीय महिलेचा दिरानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी संशयित दीपक बापू मोरे (पारोळा) याच्याविरोधात पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलाला पाणी आणण्यास पाठवत अतिप्रसंग
पीडीत महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवार, 26 मे रोजी सकाळी 8.30 पीडीता व त्यांचा मुलगा शेतात काडी कचरा वेचून जाळण्यासाठी गेले होते. यावेळी पीडीतेच्या 13 वर्षीय मुलाला दिराने विहिरीवर पाणी घेण्यासाठी पाठवले व पीडीतेसोबत अश्लील संवाद करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले तसेच पीडीतेस लाथाबुक्यांनी मारहाण करत शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय जयवंद पाटील करीत आहेत.


