दुचाकी चोरीचे सत्र कायम ; वाहनधारक धास्तावले


A two-wheeler Lumpas from Dharangaon city धरणगाव : जिल्ह्यात सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांना पकडण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याने वाहनधारकांमध्ये भीती पसरली आहे. जळगाव रोडवरील बिजासनी जिनिंगच्या बाहेरून अज्ञात चोरट्यांनी एकाची दुचाकी लांबवली असून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
युसूफ अब्दुल मुनाफ (51, पाताल नगरी) हे 16 मे रोजी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान लग्नात हजेरी लावण्यासाठी बिजासनी जिनिंग येथे गेले त्यांनी दुचाकी (एम.एच.19 वाय.7082) जिनिंग बाहेर लावली होती. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने ही दुचाकी लांबवली. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही दुचाकी मिळून न आल्यामुळे अखेर मोहम्मद युसूफ यांनी शनिवार, 27 मे रोजी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला. पुढील तपास एएसआय रामदास पावरा करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !