सुनसगावातील सुदर्शन पेपर मिलला आग : जिल्ह्यातून बंब दाखल
भुसावळ : पेपर बनवण्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या भुसावळ तालुक्यातील सुनसगावच्या सुदर्शन मिलमध्ये रविवारी सकाळी नऊ वाजेनंतर भीषण आग आग लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एक-एक करीत आगीचा विळखा अनेक विभागांपर्यंत पोहोचला असून या आगीमुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याची भीती आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून भुसावळसह जिल्ह्यातील अन्य पालिकांचे बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत.
आगीमुळे खळबळ
भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावाजवळील सुदर्शन पेपर मिल असून या मिलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलमध्ये पसरल्यानंतर विविध भागात आगीचे लोण पसरल्याने कोट्यवधींची हानी झाली. आग विझवण्यासाठी भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून अग्निशमन दलालाल पाचारण करण्यात आले असून अद्यापपर्यंत आगीवर नियंत्रण मिळालेले नसल्याचे सांगण्यात आले.
आगीचे कारण अस्पष्टआगीचे कारण अस्पष्ट
सध्या उन्हाळ्याचा कडाका अधिकच वाढला असताना पेपर मिलला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, गणेश गव्हाळे, विचवे, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सुरज पाटील आदींनी धाव घेत पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत आगीचे कारण व नुकसानीचा आकडा समारे येणार आहे.
