चोरट्यांचा मोर्चा आता सायकलीकडे : जळगावातील तरुणाची 20 हजारांची सायकल लांबवली
Expensive bicycle of Jalgaon youth extended जळगाव : दुचाकी चोरीचे सत्र जिल्ह्यात सुरू असतानाच चोरट्यांनी आता मोर्चा महागड्या सायकलीकडे वळवला आहे. जळगाव शहरातील मनिषा कॉलनीतील तरुणाची 20 हजार रुपये किंमतीची सायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी शनिवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
महागडी सायकल लांबवली
जळगाव शहरातील मनिषा कॉलनीत ललित सतीषचंद्र मणियार (35) हा तरुण परीवारासह वास्तव्यास असून बुधवार, 24 मे रोजी सकाळी 10 वाजता ललितने त्याची सायकल ही घरासमोर असलेल्या भिंतीला पार्क केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची सायकल चोरून नेली. ललितने सायकलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवार, 27 मे रोजी सकाळी 10 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.


