यावल शहरातील 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग : संशयिताला अटक


19-year-old girl molested in Yaval City : Suspect Arrested यावल : शहरातील एका मॉलमध्ये काम करणार्‍या तरुणीशी अश्लील संवाद साधून तरुणाने विनयभंग केला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून इक्राम उद्दीन अल्लाउद्दीन शेख (आयशा नगर, यावल) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली.

विनयभंग करीत अश्लील वर्तन
यावल शहरातील एका भागातील मॉलमध्ये रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कॅश काउंटर कामावर असलेल्या 19 वर्षीय तरुणीजवळ जावून ईक्रामोद्दीन अल्लाउद्दीन शेख याने सामान घेण्याच्या बहाण्याने येत तरुणीशी अश्लील संवाद साधत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. पीडीतेने यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीतास पोलिसांनी अटक केली. तपास यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय देवरे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !