न्हावी गावातील किराणा दुकानात सुरू होती गुटख्याची विक्री : लाखोंचा साठा पाहून जळगावातील अधिकार्यांना बसला धक्का
Gutkha worth seven and a half lakhs seized from a grocery shop in Nahavi village फैजपूर : न्हावी गावातील किराणा दुकानदाराने गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा केल्याची माहिती जळगावातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक आप्पासाो.पवार व प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांना मिळाल्यानंतर अधिकार्यांनी मोठ्या पथकाला घेवून छापेमारी करीत तब्बल सात लाख 31 हजार 320 रुपयांचा गुटखा जप्त केल्याने यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. जळगावातील अधिकार्यांना गुटख्याची माहिती मिळते मात्र स्थानिक यंत्रणा व जिल्ह्यावरील यंत्रणा करते काय? असा प्रश्न सुज्ञ नागरीक उपस्थित करीत आहेत.
छापेमारीने उडाली खळबळ
न्हावी, ता.यावल येथील सुनील किराणा या विक्की अशोक माखिजा (39, न्हावी, ता.यावल) यांच्या दुकानात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची व साठेबाजी करण्यात आल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी केसरयुक्त विमल पानमसाला, सागर पानमसाला, करमचंद सुपारी, केसी तंबाखू पाऊच असा सात लाख 31 हजार 320 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी विक्की माखिजा या दुकानदाराला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहेत.
