गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह युपीतील तरुण चोपडा पोलिसांच्या जाळ्यात
Tarun Chopra from UP in police net with Gavathi Katta and two live cartridges चोपडा : चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे शस्त्र तस्कराच्या मुसक्या आवळत दोन जिवंत काडतूस व गावठी कट्टा जप्त केला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वासूकुमार हरीशकुमार सेनठाकूर (20, रा.यिकाडे, ता.सरदाना, जि.मेरठ उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा शहरातील सत्रासेन फॉरेस्ट नाक्याजवळ एक तरुण गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला सूचना केल्या. पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे यांनी कारवाई करत संशयित आरोपी वासूकुमार हरेशकुमार सेनठाकूर याला ताब्यात घेतल्यानंतर अंग झडतीत त्याच्याकडील गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहे.


