भरधाव कारने उडवल्याने अभियंता तरुण ठार : चिमठाणेत शोेककळा


Young engineer killed by speeding car: Shoekkala in Chimthane शिंदखेडा : तालुक्यातील चिमठाणे गावातील अभियंता तरुणाचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावाच्या कच्चा रस्त्यावर रविवारी दुपारी घडला. शिंदखेडा पोलिसात सायंकाळी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर (23, रा.चिमठाणे) असे मयताचे नाव आहे.

अपघातानंतर कार चालक पसार
चिमठाणे गावातील प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर (23, रा. चिमठाणे, ता. शिंदखेडा) हा तरुण रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पायी चालत असताना भरधाव कार (एम.एच.18 डब्ल्यू.1273) ने धडक दिल्याने तएण प्रथमेश अहिरे हा दूरवर फेकला गेला. त्याच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर कार चालक घटना स्थळावरून पसार झाला. गंभीर अवस्थेत पडलेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी संतोष हिलाल धनगर (49, रा.चिमठाणे, ता.शिंदखेडा) यांनी रविवारी सायंकाळी सात वाजता शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने कार चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.