उघड्या घरातून चोरट्यांनी दिड लाखांचे दागिने लांबवले : चाळीसगाव तालुक्यातील घटना


Jewelery worth one lakh 32 thousand was stolen from a house in Pimpalwad Mhalsa चाळीसगाव : घर उघडे असल्याची संधी चोरट्यांनी एक लाख 32 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. ही घटना रविवारी सायंकाळी 5.30 वाजता तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा येथे उघडकीस आली. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसात लांबवले दागिणे
उमेश वीरभान पाटील (41, पिंपळवाड म्हाळसा, ता.चाळीसगाव) हे आपल्या परीारासह वास्तव्याला असून शेती काम करतात. रविवार, 28 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या उघड्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील पत्र्याच्या पेटीतील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 32 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उमेश पाटील यांनी मेहुणबारे पोलिसात तक्रार दिली. तपास पोलीस नाईक प्रकाश कोळी करीत आहे.


कॉपी करू नका.