म्हसावदच्या तरुणाचा दुचाकी झाडावर आदळल्याने मृत्यू


Youth of Mhasavad died after his bike hit a tree जळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात म्हसावद येथील 35 वर्षीय तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. हा अपघात जळगाव तालुक्यातील नागदूली ते पद्मालय मंदीराच्या प्रवेशद्वारदम्यान मंगळवार, 30 मे रोजी सायंकाळी सात वाजता घडला. योगेश पंडीत गायकवाड (35, म्हसावद) असे मयत तरुणाचे नाव आहे.

तरुणाच्या मृत्यूने हळहळ
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे योगेश गायकवाड हा तरूण पत्नी सुरेखा आणि चार मुलांसह वास्तव्याला होता. शेती व सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी सायंकाळी सात वाजता एरंडोल येथून योगेश हा दुचाकीवरून बाजरीचा कट्टा घेवून म्हसावद येथे येण्यासाठी निघाला होता. नागदुली ते पद्मालय मंदीराच्या प्रवेशद्वार रस्त्यावरील वळणावरून जात असतांना अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट निंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात योगेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. परीरातील स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. बुधवारी सकाळी 10 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रथमिक तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !