सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारही स्वीकारला भुसावळात येणार तोच गाठले मृत्यूने
Accidental death of railway employee of Jamner due to train collision पाचोरा :जामनेरातील रहिवासी असलेल्या रेल्वे कर्मचार्याचा सेवानिवृत्तीचा निरोप स्वीकारल्यानंतर अवघ्या काही वेळेतच अपघाती मृत्यू झाला. सुरेश मोहन सोनवणे (60, रा.वाकीरोड, जामनेर) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. सोनवणे हे रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स विभागात कार्यरत होते. पाचोरा येथे बुधवारी निरोप दिल्यानंतर दुपारी ते भुसावळात डीआरएम कार्यालयात सत्कार स्वीकारताना येत असताना ही दुर्घटना घडली.
सेवानिवृत्तीच्या दिवशी गाठले मृत्यूने
सुरेश मोहन सोनवणे हे गेल्या 32 वर्षांपासून रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स म्हणून नोकरीला होते. त्यांच्या वयाची 31 मे रोजी साठ वर्ष पूण झाल्याने आज त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्या निमित्ताने पाचोरा येथे त्यांच्या कार्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुपारी भुसावळ येथील रेल्वे कार्यालयात देखील इतर कर्मचार्यांसोबत सत्कार होणार होता. बुधवारी दुपारी पाचोरातील कार्यालयात सत्कार झाल्यानंतर साडेबारा वाजता काशी एक्सप्रेसने भुसावळ येथे जाण्यासाठी निघाले होते मात्र पाचोरा रेल्वे स्थानकात जवळील रेल्वे खंबा क्रं. 372/9/11 त्यांचा जखमी अवस्थेतील मृतदेह आढळला,
कर्मचार्यांची धाव
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे मुख्य कर्मचारी तथा कल्याण निरीक्षक शिवशंकर राऊत आणि रामेश्वर निंबाळकर यांनी घटनास्थळी गाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. यासाठी रूग्णवाहिका चालक अमोल पाटील यांनी सहकार्य केले. दरम्यान त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत पाचोरा लोहमार्ग पोलीस दूरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपासपाचोरा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर बोरुडे करीत आहे. मयताच्या पश्चात मुलगा, मुलगी व पत्नी असा परीवार आहे.


