चोरलेल्या दुचाकीचा आठवडेभरात लागला तपास : दुचाकी मिळताच चोपड्यातील वाहन मालकाच्या चेहर्यावर फुलले हास्य
The investigation of the stolen bike took weeks: the owner of the vehicle in Chopda smiled when the bike was found. यावल : जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे दररोज सत्र सुरू असताना चोरलेली महागडी दुचाकी भेटणे तशी अशक्यप्राय बाब मात्र चोपड्यातील वाहन मालकाबाबत काहीसा वेगळा प्रकार घडला. यावल तालुक्यातील कासारखेडा गावात बेवारस स्थितीत मिळून आलेली दुचाकी ही पोलीस तपासात चोपडा शहरातून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले व या प्रकरणी चोपडा पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे कळल्यानंतर यंत्रणेचा संपर्क झाला. चोपडा पोलिसांना ही दुचाकी यावल पोलिसांनी ताब्यात दिली. दरम्यान फिर्यादी तथा मूळ मालकाला आठवडाभरातच चोरी गेलेली दुचाकी परत मिळाल्याने त्यांचा चेहरा आनंदा फुलला.
अन दुचाकी मालकाचा चेहरा खुलला
चोपडा शहरातील गंगाई नगर दोनमधून प्रवीण रामदास घिसाडी यांची दुचाकी चोरी झाली. या प्रकरणी घिसाडी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोपडा येथून चोरी केलेली ही दुचाकी अज्ञात चोरट्याने यावल तालुक्यातील कासारखेडा गावच्या मुख्य चौकामध्ये लावून पळ काढला होता. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान व होमगार्ड संजय साळुंखे यांनी ही दुचाकी यावल पोलीस ठाण्यात आणली व या संदर्भात चोपडा पोलिसांना माहिती दिली.
पोलीस प्रक्रियेनंतर मूळ मालकाला मिळाली दुचाकी
चोपडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार दीपक विसावे हे फिर्यादी प्रवीण घिसाळी यांच्यासह यावलला दाखल झाले व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करीत चोपडा पोलिसांच्या ताब्यात ही दुचाकी त्यांना परत देण्यात आली.
