चोपडा शहरातील कुविख्यात गुन्हेगार वैभव टकल्या स्थानबद्ध


Notorious criminal Vaibhav Taklya of Chopda city arrested चोपडा : कुविख्यात गुन्हेगार वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी (28, बारीवाडा, चोपडा) यास ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. टकल्या गवळीविरोधात खून, जबरी चोरी, शरीराविरोधात दुखापत यासह गंभीर गुन्हे दाखल होते शिवाय त्यास सहा महिन्यांसाठी हद्दपारही करण्यात आले मात्र वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने निरीक्षक के.के.पाटील यांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्याबाबत आदेश पारीत केले. संशयिताची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईचा गुन्हेगारी वर्तुळाने मोठा धसका घेतला आहे.

यांनी केली कारवाई
चोपडा निरीक्षक के.के.पाटील यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक संतोष चव्हाण, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, सुनील पाटील, प्रदीप राजपूत, विलेश सोनवणे, रवींद्र पाटील आदींनी ही कारवाई केली. एलसीबी निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांचे सहकार्य लाभले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !