Cinestyle robbery in Jalgaon : जळगावातील स्टेट बँकेतील पावणेचार कोटींचे दरोडा प्रकरण : दरोडेखोरांचे हेल्मेटसह कपडे सापडले


Cinestyle robbery in Jalgaon  : Helmet and mobile phone found along with bank DVR जळगाव : एखाद्या चित्रपटात दर्शवल्याप्रमाणेच रेकी करून आलेल्या दरोडेखोरांनी अवघ्या 15 मिनिटात बँक मॅनेजरसह कर्मचार्‍यांना बंधक बनवत 17 लाखांच्या रोकडसह तीन कोटी 60 लाखांचे सोने लूटल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सुरक्षा रक्षक असतानाही दरोडेखोरांनी मारहाण करीत लूट केली हेदेखील या दरोड्यात विशेष !. कालिका माता मंदिर परीसरातील एसीबीआय शाखेत दरोडा टाकल्यानंतर मॅनेजरच्याच दुचाकीवरून पसार झालेल्या दरोडेखोरांनी अयोध्या नगर भागातील नाल्याजवळ गुन्ह्यात वापरलेला धारदार चॉपरसारखा चाकू, हेल्मेट, बँकेतून लांबवलेला डीव्हीआर, मॅनेजरसह कर्मचार्‍यांचे फेकलेले पाच मोबाईल फेकून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळ काढल्याचा संशय आहे. दरम्यान, यंत्रणेने फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत या सर्व वस्तू जप्त केल्या असून तपासात या बाबीही महत्त्वाच्या ठरणार आहेत.

रेकी करूच दरोडा घातल्याचा संशय
जळगावच्या कालिका माता मंदिर परीसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या नजीक स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या परीसरात 70 टके नागरीक उच्चभू असून सर्व बागायतदार आहेत. राष्ट्रीयकृत बँक असल्याने खातेदार असलेल्या नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिणे तारण ठेवले आहेत तसेच दागिणे सुरक्षित राहण्याकरीता बँकेतच लॉकरमध्ये ठेवले आहेत. ही बाब बहुधा दरोडेखोरांना ठावूक असल्यानेच त्यांनी काही महिने वा काही दिवस रेकी केल्याचा संशय आहे. अवघ्या 15 मिनिटात दरोडा फत्ते करण्यात आल्याने दरोडेखोर कुविख्यात व रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे स्पष्ट आहे.

असा आहे सिनेस्टाईल दरोड्याचा थरार
राष्ट्रीयकृत बँकांची वेळ आता सकाळी साडेनऊची झाल्याने बँक कर्मचारी वेळच्या 20 मिनिटे आधी बँकेत पोहोचतात. गुरुवारीदेखील स्टेट बँक कर्मचार्‍यांनी 9.10 वाजेच्या सुमारास बँक उघडली. यावेळी ग्राहक प्रवेशासाठीचे मोठे गेट बंदच होते तर बँकेच्या पाठीमागून कर्मचार्‍यांसाठी असलेल्या दरवाजातून सिक्युरीटी गार्ड, कॅश इन्चार्ज, हाऊस किपींग व क्रेडीट कार्ड विभागाचा कर्मचारी बँकेत दाखल झाला. कर्मचार्‍यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या दरोडेखोरांनी मागूनच बँकेत हेल्मेट परीधान केलेल्या अवस्थेत प्रवेश करीत कर्मचार्‍यांना चाकूच्या धाकावर धमकावत त्यांच्याकडील आधी चार मोबाईल काढून घेतले व नंतर दोरीने बांधून ओलीस ठेवत डोळ्यात स्प्रे मारून आधी बंधक बनवले व तोंडाला टेप (चिघटपट्टी) लावून कुठलीही हालचाल न करण्याचा इशारा करीत बसवून ठेवले.

मॅनेजर दाखल होताच दरोडा केला फत्ते
मॅनेजर राहुल महाजन (37, एम.जे.कॉलेजसमोर, जळगाव) हे गुरुवारी 9.45 वाजता दाखल झाल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजताच दरोडेखोरांनी दरवाजा उघडताच मॅनेजरला मारहाण करताच वॉश रूमकडे नेत आधी मोबाईल हिसकावला. वॉश रूमजवळ कॅश इन्चार्ज देवेंद्र नाईक, हाऊस किपिंग मनोज सूर्यवंशी व सिक्युरीटी गार्ड संजय गोविंदा बोखारे यांना बंधक बनवून तोंडाला चिघटपट्टी लावून बसवण्यात आल्यानंतर हाऊस किपिंग मनोज रमेश सूर्यवंशी यास कॅश रूमकडे आणण्यात आले व दरोडेखोरांनी धमकावताच त्याने मॅनेजरकडील चावीने कॅश रूम उघडून दिली. यावेळी मॅनेजरची एका दरोडेखोराशी झटापट झाल्यानंतर दरोडेखोरोचे हेल्मेट खाली पडताच त्याने धारदार चाकू मांडीवर मारल्याने मॅनेजर जखमी झाले तर मनोजला त्याने दरोडेखोराला पकड पकड असा आवाज दिला मात्र त्याने दरोडेखोराला पकडले नाही तर पुन्हा मॅनेजरला मारहाण केल्यानंतर गोल्ड तिजोरी उघडण्यात आली व सोबत आणलेल्या काळ्या बॅगमध्ये सर्व तारण सोने व कॅश भरण्यात आली व इशार्‍यानेच मॅनेजरला चाबी दे चाबी दे म्हणत चाकू लावून दुचाकीची चावी काढून घेतली.

पावणे चार कोटींचा ऐवज लुटला
हेल्मेटधारी दरोडेखोरांनी यावेळी 17 लाख 10 हजार 370 रुपयांची रोकड लूटली तर तीन कोटी 60 लाख रुपयांचे बँकेत तारण ठेवलेले सहा किलो 16 ग्रॅम वजनाचे दागिणे काळ्या बॅगेत टाकून मॅनेजरच्या दुचाकी (एम.एच.19 बी.ई.2778) ने धूम ठोकली. काही वेळेनंतर कर्मचार्‍यांनी आपली सुटका करीत पोलिसांना माहिती दिल्यानंतर भर दिवसा सकाळच्या सुमारास पडलेल्या दरोड्याचा थरार उजेडात आला.

अयोध्यानगरात सापडले हेल्मेटसह डीव्हीआर जप्त
बँकेत दरोडा पडल्याची बाब जिल्ह्यातील यंत्रणांना वायरलेसद्वारे कळवण्यात आल्यानंतर नाकाबंदी लावण्यात आली तर अयोध्या नगर भागातील एका नाल्याजवळ दरोडेखोरांचे हेल्मेट, मॅनेजरसह कर्मचार्‍यांचे पाच मोबाईल, बँकेचा डीव्हीआर फेकण्यात आल्याने यंत्रणांनी ते जप्त केले. पोलीस तपासात या बाबी तपासाच्या दुवा ठरणार आहेत.

संशयिताना लवकरच जेरबंद करणार : पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार म्हणाले की, 17 लाखांची रोकड लुटण्यात आली असून सुमारे सहा किलो वजनाचे सोन्याचे दागिणे लूटण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणांना काही क्लू मिळाले असून त्या आधारे लवकरच आम्ही या गुन्ह्याची उकल करू, असे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !