जळगावातील बेकायदा लॉटरी सेंटरवर छापेमारीने खळबळ : चौघांविरोधात गुन्हा


Excitement due to raid on illegal lottery center in Jalgaon : Crime against four जळगाव : जळगाव शहरातील मध्यवर्ती जुने बसस्टॅण्डलगतच्या लॉटरी गल्लीत बेकादेशीररीत्या सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी सेंटरवर परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने अचानक धाड टाकून चार संगणक संचासह 68 हजार 660 रुपयांचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कुळकर्णी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांच्यासह पथकातील सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागुल, रतन गीते, बशीर तडवी, उमेश भांडारकर, विलास पवार, योगेश बोरसे यांच्या पथकाने अचानक लॉटरी सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी बाळू जाधवराव कोळी (32, रा.घार्डी, ता.जळगाव), अजय पंडीत कोळी (23, रा.वाल्मीकनगर) यांच्यासह इतर दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 41 हजार 660 रुपये रोख, सीपीयु, संगणक स्क्रीनसह ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाने चालवल्या जाणार्‍या बेकायदेशीर चिट्ट्या असा ऐवज जप्त करण्यात आला. पोलीस नाईक योगेश इंधाटे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !