वेगवेगळ्या घटनेत दोघांनी घेतला गळफास : अमळनेर तालुक्यातील घटना


Two hanged themselves in different incidents : incident in Amalner taluka अमळनेर : अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या दोन घटनेत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 31 मे रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

ताडेपुरा येथील टॅक्सी चालकाची आत्महत्या
ताडेपुरा येथील रहिवासी टॅक्सीचालक राकेश चंद्रकांत सातपुते (35) याने बुधवार, 31 रोजी पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरात छताच्या लोखंडी अँगलला सुताची दोरी बांधून आत्महत्या केली. भावाने अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राकेशच्या पश्चात आई , वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

भिलालीतील दिव्यांग बांधवांची आत्महत्या
भिलाली येथील दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या गुलाब धनसिंग गिरासे (47) यांनी बुधवार, 31 मे रोजी सकाळी साडे सहा वाजेपुर्वी बाभळीच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. इंद्रसिंग गिरासे यांनी मारवड पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !