जळगावात पत्रकाराच्या निवासस्थानी धाडसी घरफोडी : आठ लाख 20 हजारांचा ऐवज चोरीला
Daring burglary at journalist’s residence in Jalgaon : 8 lakh 20 thousand was stolen जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून मेहरुण भागातील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेल्या नदवी टाईमचे संपादक तथा धर्मगुरूच्या घरात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत एक लाखांच्या रोकडसह आठ लाख 20 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्रकार पर्यटनाला चोरटे दाराला
नदवी टाईम्य न्यूजचे संपादक तथा धर्मगुरू मोहम्मद हारून अब्दुल कादीर खाटीक (43, मेहरूण, जळगाव) हे आपल्या परीरवारासह मेहरुणच्या युनूस राणानी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. 23 ते 31 मे दरम्यान खाटीक कुटूंब उन्हाळी सुटीनिमित्त पर्यटनासाठी दुबईला गेल्यानंत प्लॅट बंद असल्याची संधी चोरट्यांनी आठ दिवसादरम्यान साधली. प्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करत घरातील कपाटाील एक लाखांची रोकड आणि ात लाख 20 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 8 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. नदवी हे बुधवार, 31 मे रोजी दुपारी 12 वाजता घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आला. गुरुवारी त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.


