दहिवद गावातील अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण


Abduction of minor girl from Dahiwad village by unknown person अमळनेर : अमळनेर तालुक्यातील दहिवद गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण करण्यात आले. या प्रकरणी गुरुवार, 1 जून रोजी रात्री 8 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घरी कुणीही नसताना मुलीचे अपहरण
अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आई-वडील व भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. नातेवाईकांकडे लग्न असल्या कारणामुळे पीडित मुलीचे आई-वडील हे मध्यप्रदेशात गेल्यानंतर पीडित मुलगी व तिचा भाऊ घरी होते. शेजारी राहणार्‍या व्यक्तीला पीडित मुलगी घरात नसल्याचे कळाल्याने त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. पीडीतेचे आई-वडील हे तातडीने मध्यप्रदेशातून दहिवदला व नातेवाईक, मैत्रिणी व इतर गावांमध्ये शोध घेतला मात्र पीडीता आढळली नाही. गुरुवारी रात्री पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !