गहाळ झालेल्या एटीएमद्वारे अमळनेरातील महिलेला 52 हजारांचा गंडा : आरोपी अखेर जाळ्यात


A woman in Amalner was robbed of 52 thousand through a missing ATM : the accused is finally in the net अमळनेर : अमळनेरच्या 35 वर्षीय महिलेचे एटीएम कार्ड हरवल्यानंतर हे कार्ड प्रकाश कृष्णा पाटील (35, दरेगाव, ता.अमळनेर) या तरुणाला सापडले. तरुणाने हे कार्ड बँकेत वा पोलिसांना परत न करता खात्यातून पैसे काढल्यास कुणाला ही बाब कळणार नाही , असा समज करीत सुरूवातीला 40 हजार व नंतर 11 हजार 700 रुपये काढले. त्यानंतर संशयित घरी परतला. एटीएम हरवल्यानंतर महिलेने संबंधित बँक गाठून घडल्या प्रकाराची माहिती दिली. बँकेने खात्यातून दोन ट्रान्झेक्शन (व्यवहार) झाल्याची माहिती दिल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करीत भामट्याचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतल्यानंतर त्याने घडल्या प्रकाराची कबुली देत खात्यातून काढलेली रक्कम परत केली मात्र महिलेने तक्रार दिल्याने तरुणाला गुरुवारी अटक करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे लागला शोध
अमळनेर शहरातील पैलाड भागात सविता प्रल्हाद पाटील (35) या महिलेचे एटीएम कार्ड हरवले मात्र या कार्डासोबतच कव्हरमध्ये पीन क्रमांकही टाकण्यात आल्याने त्या घाबरल्या व त्यांनी बँकेला याबाबतची माहिती दिली मात्र भामट्याने दोन व्यवहार करीत शुक्रवार, 26 मे व सोमवार, 29 मे रोजी या दोन दिवसात प्रत्येकी 40 हजार आणि 11 हजार 700 असे एकूण 51 हजार 700 रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अमळनेर पोलिसात महिलेने तक्रार दिल्यानंतर अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांनी सीसीटीव्हीद फुटेजद्वारे भामट्याचा शोध घेत त्यास गुरुवारी सायंकाळी अटक करीत त्याच्याकडून लांबवलेली रक्कम जप्त केली. तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !