जळगाव तालुक्यातील 26 वर्षीय विवाहितेचा पाठलाग करीत विनयभंग
A 26-year-old married woman in Jalgaon taluka was chased and molested जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावात राहणार्या महिलेचा पाठलाग करत दगड मारून विनयभंग करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पाठलाग करीत केला विनयभंग
जळगाव तालुक्यातील एका गावात 26 वर्षीय महिलाही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 23 मे रोजी संध्याकाळी सहा वाजता गावातील संशयित गणेश बाबुराव कोळी याने महिलेचा पाठलाग केला. नंतर तिला दगड मारला. दगड मारण्याचा जाब विचारला असता त्याने महिलेची अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तिथेच आरडा-ओरड केली. त्यानंतर संशयित पसार झाल्यानंतर पीडीतेने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशय आरोपी गणेश बाबुराव कोळी यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.


