भरधाव लक्झरी ओव्हरटेक होताच पाळधीनजीक उलटली : 24 प्रवासी जखमी
As soon as Bhardhav luxury overtook, the police overturned : 24 passengers were injured जळगाव : अकोला शहराकडून अहमदाबादकडे भरधाव वेगाने निघालेली लक्झरी बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धरणगाव रस्त्यावरील पाळधी गावानजीक उलटल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता घडली. हा अपघात हॉटेल सुगोकीजवळ घडल्यानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली तर या अपघातात 24 हून अधिक प्रवासी जखमी झाले. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या पाळधी येथील निवासस्थानी जात असतांना त्यांना हा अपघात दिसताच त्यांनी उलटलेल्या लक्झरीमधून जखमी प्रवाश्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली तर रग्णवाहिकेला बोलवून जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात
धरणगावकडे जाणार्या महामार्गावर पाळधी गावानजीक असलेल्या सुगोकी हॉटेलजवळील महामार्गावर रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास लक्झरी (जी.जे.18 बी.व्ही.3042) ही उलटली. या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले असून जळगाव जिल्हा रुग्णालयात 22 जखमींना आणण्यात आले आहे.


