अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत फोटो व्हायरल : तरुणाविरोधात गुन्हा


A photo of molesting a minor girl goes viral: a crime against a youth जळगाव : अल्पवयीन मुलीस भेटण्यास बोलावल्यानंतर तिच्यासोबत फोटो काढून नंतर ते व्हायरल करीत तरुणीची बदनामी करण्यात आली. या प्रकरणी शहरातील एकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भेटण्यासाठी बोलावत केला विनयभंग
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परीसरातील एका भागात 14 वर्षीय अल्पवयीन पीडीता वास्तव्याला आहे. 21 मे रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास संशयित तुषार प्रमोद वाघ याने पीडित अल्पवयीन मुलीला भेटला व तू मला भेटली नाही तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली होती. पीडित मुलगी घाबरून गेल्यानंतर तरुणाला भेटण्यासाठी गेली असता तरुणाने तिच्यासोबतचे फोटो काढून ते फोटो सोशल मीडियात प्रसारीत केले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने रविवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !