कुसूंबा गावातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले तरुणाविरोधात गुन्हा
A crime against a young man who seduced a minor girl from Kusumba village जळगाव : अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याचा प्रकार कुसुंबा गावात घडला. या प्रकरणी गावातील पवन संतोष पाटील (कुसूंबा) या तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गावातील तरुणाविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील एक भागात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना गावातील पवन संतोष पाटील याने तिला काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु तिचा कुठेही शोध न लागल्याने रविवारी सायंकाळी सहा वाजता पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित पवन पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन करीत आहे.


