बांभोरी आंदोलनातील कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


A laborer in the Bambhori movement died of a heart attack जळगाव : बांभोरी येथील कंपनीसमोर सुरू असलेल्या आंदोलनातील कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शेखर गोकुळ पाटील (50, खेडी कढोली, ता.एरंडोल) असे मृत कामगाराचे नाव आहे. शेखर पाटील हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून बांभोरी येथील हिताची कंपनीत कंत्राटी पध्दतीने नोकरीला होते.

हृदविकाराचा तीव्र झटका येताच मृत्यू
गेल्या 23 मे पासून त्यांच्यासह इतर कामगारांनी हिताची कंपनीसमोर प्रलंबित व विविध मागण्यांसाठी कंपनीसमोर बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले. रविवारी आंदोलनाचा तेरावा दिवस होता. या आंदोलनात शेखर पाटील हे देखील सहभागी होते. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी असतांना गोकुळ पाटील यांना हदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. कंपनीच्या प्रशानाच्या दबावामुळेच शेखर पाटील यांचा मृत्यू झाला आहे असा आरोप सहकारी कामगार आणि नातेवाईकांनी केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व कंपनीच्या कामगारांची मोठी गर्दी झाली होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !