संतापजनक : वासनांध पित्याने मुलीवरच केला अत्याचार : चाळीसगाव तालुक्यातील घटना
Infuriating: Lustful father molested daughter himself : Incident in Chalisgaon taluka चाळीसगाव : पिता-पूत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली. वासनांधी पित्याने पोटच्या नऊ वर्षीय गोळ्यावरच अत्याचार केल्याची संतापजनक तसेच समाजमन संतप्त करणारी घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडीतेच्या आईने तक्रार दिल्यानंतर नराधम पित्याला अटक करण्यात आली. सावळीराम दिलीप गायकवाड (चाळीसगाव तालुका) असे अटकेतील नराधमाचे नाव आहे.
घरी कुणी नसताना नराधमाने केला अतिप्रसंग
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात प्रतिकुल परीस्थितीत उदरनिर्वाह करणार्या कुटूंबातील पीडीत मुलीची आई आजारी असल्याने व घरात सलाईन लावण्यासाठी जागा नसल्याने दिराच्या घरी सलाईन लावण्यासाठी आल्यानंतर नऊ वर्षीय चिमुकली घरात एकट असतानाच सैतान बापाने तिच्यावर अतिप्रसंग केला. रविवारी रात्री 11 वाजता आई घरी आल्यावर घाबरलेल्या पीडीतेने हा प्रकार सांगितला. दिड महिन्यापूर्वीही या नराधम बापाने असाच प्रकार केल्याची माहिती पीडिताने सांगितल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. या प्रकाराचा जाब घरच्या लोकांनी विचारल्यानंतर हा नराधम पळाला. याबाबत पीडीतेच्या आईने चाळीसगाव शहर पोलिसात सोमवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम पित्याला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.


