साईबाबांच्या जन्मभूमीबाबत 29 पुरावे सादर करणार
पाथरी संस्थानच्या कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांची माहिती
पाथरी : साईंच्या जन्मभूमीवर शिर्डीकर विनाकारण वाद घालत असून या वादावर आता पाथरीकर 29 पुरावे सादर करणार आहेत, अशी माहिती पाथरी संस्थानच्या कृती समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, रविवारपासून शिर्डी बंदचे आवाहनही करण्यात आलं आह. मात्र हा वाद घालणं निरर्थक असून आम्ही साईबाबांच्या जन्मभूमीबाबत 29 पुरावे त्यांनाही सादर करु तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीही सादर करू, अशी भूमिका आता पाथरीकरांनी घेतली आहे.